मराठीत रिपोर्ताज करणाऱ्या स्वतंत्र पत्रकारांसाठी फेलोशिप
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ७ ऑगस्ट २२
समाजात होत असलेले परिवर्तन आणि प्रत्येक क्षेत्रात घडणाऱ्या घटनांवर बारीक लक्ष ठेवणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे. घटनांची माहिती देण्याबरोबरच बातमीच्या खोलात जाऊन माहिती मिळवणे, लोकांच्या समस्या आणि सर्वसमावेशक लोकशाहीसाठी आवश्यक गोष्टींचे पालन होते आहे की नाही यावर लक्ष ठेवणे, नागरीकांचे मानवी आणि मूलभूत हक्क यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करणे, जनहिताबाबत सरकारचे अपयश अधोरेखित करणे, व्यवस्थेला प्रश्न विचारणे, आरोग्य, कृषी आणि राजकारण ते पर्यावरण क्षेत्रात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांचे सखोल वार्तांकन करणे, अशा अनेक जबाबदाऱ्या पत्रकारांना पार पाडाव्या लागतात.
या कामात स्वतंत्र पत्रकारांना मदत करण्यासाठी नॅशनल फाउंडेशन ऑफ इंडिया (NFI) मीडिया फेलोशिपचे पाचवे पर्व सादर करीत आहे. या फेलोशिपच्या पहिल्या पर्वात NFI ने देशातील 21 सर्वोत्कृष्ट पत्रकारांची निवड केली होती. आपण त्यांच्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या कामाबद्दल येथे वाचू शकता. दुसऱ्या पर्वात एनएफआयने इंग्रजी आणि मल्याळ भाषेतील ३६ पत्रकारांना ही संधी दिली. आपण त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल येथे वाचू शकता. तिसऱ्या पर्वात आम्ही 35 स्वतंत्र हिंदी पत्रकारांना ही संधी दिली.
आता पाचव्या पर्वात आम्ही आणखी ३० स्वतंत्र पत्रकारांना ही संधी देणार आहोत. त्यापैकी १५ फेलोशिप मराठी भाषेत स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्यांना दिली जाणार आहे.
फेलोशिपमध्ये काय समाविष्ट आहे?
NFI च्या या फेलोशिपमध्ये निवडलेल्या प्रत्येक ‘फेलो’ला 1000-1500 (हजार ते पंधराशे) शब्दांच्या बातमीसाठी 30,000 (तीस हजार) रुपये अनुदान मिळते. ‘फेलो’ने सार्वजनिक विषयांना हात घालत कोणत्याही समस्येवर एक सखोल बातमी एका महिन्याच्या आत तयार करणे अपेक्षित आहे. निवड झालेल्या फेलोंना गरज भासल्यास अधिक चांगले वृत्तांकन कसे करता येईल यासाठी ज्येष्ठ पत्रकारांचे मार्गदर्शनही उपलब्ध करुन दिले जाते. मॅक्स महाराष्ट् वेब पोर्टलवर या बातम्या प्रकाशित केल्या जातील.
फेलो कसे निवडले जातात?
याबाबतचा सविस्तर तपशीलही आम्ही खाली दिला आहे. फेलोशिपसाठी निकष काय आहेत, बातमीची संकल्पना कशी लिहावी आणि अर्ज कसा करावा हे तिथे वाचता येईल. अर्ज करण्यापूर्वी ही माहिती काळजीपूर्वक वाचा.
प्रख्यात पत्रकारांचा समावेश असलेली NFI ची निवड समिती अर्जांच्या आधारे फेलोची निवड करत असते.
समाजाच्या तळागाळातील आणि दुर्गम भागातील अर्जदारांना प्राधान्य दिले जाते.
निवडलेल्या ‘फेलो’ची नावे अर्ज करण्याची तारीख संपल्यापासून 15 ते 20 दिवसांच्या आत घोषित केली जातात. यशस्वी उमेदवारांना ईमेल आणि NFI वेबसाइटद्वारे याबद्दल माहिती दिली जाते.
अर्ज आणि अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
या फेलोशिपमधील आमचे सल्लागार आहेत :